नमस्कार गुरुवर्य !
मि, Sanket Pilvilkar, Dip. in Mech. from SPS Chiplun. माझं ४ वर्षा च manufacturing experience असुन सुद्धा CNC VMC ची Programing वैगरे काहिच माहित नव्हते.
एका मित्रांनी मला CNC TECH आणी Ravindra Pillay सरांच उल्लेख केला होता.
मी Dec2021 ला class join झालो
‘जिथं ज्ञानाची कमी तिथं गुरुंची महती जाणावी’ त्याप्रमाणं आपण दिलेल्या मार्गदर्शनाखाली, ज्या गोष्टींचं ज्ञान अवगत न्हवतं अशा बऱ्याचशा गोष्टी माहीत झाल्यामुळे माझ्यात असणारा आत्मविश्वास उंचावला गेलाय त्यामुळं ज्या क्षेत्रात मी इतके दिवस नोकरी (कामधंदा) करत होतो त्याची इतत्म्भूत माहितीच मिळाली न्हवती पण त्याची कमतरता मात्र तुम्ही पुरेपूर भरुन काढलीत त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार.
असं सहजासहजी कोण कुणाला मार्गदर्शन करत नसतं पण तुम्ही स्वतःहून बोलावून ज्या काही टीप दिल्यात त्यामुळं माझ्यात झालेला बदल अगदी प्रशंसनीय आहे. त्याचं सर्वस्वी क्रेडीट तुम्हालाच जातं. परिस्थितीनुरूप अनुभवलेल्या सभोवतालच्या वास्तविकतेवरुन आपल्या शिष्याच्या आयुष्यात कशारीतीने ज्ञानाची भर पडेल ह्या सर्व गोष्टींची पारख गुरुजन ठेवत असतात त्याप्रमाणं आपणही माझ्यावर थोडा प्रकाश टाकून प्रेरणा दिलीत. येणाऱ्या पुढील काळात जेंव्हा कधी तुमचं मार्गदर्शन हवं असेल तेंव्हा नक्की, तुमची कृपादृष्टी माझ्यावर सदैव राहील, असा आशावाद ठेवून आपणास साष्टांग दंडवत प्रणाम करतो.
त्रिवारधन्यवाद!