सर तुम्ही एक महान शिक्षक आहात तुमची शिकवण्याची पद्धत ही समोरच्या विद्यार्थ्यांच्या आकलन शक्तीवर अवलंबून आहे तुम्ही स्वताहून कोणताही रेडिमेट प्रोग्रॅम न लिहिता विद्यार्थ्यांना स्वतःहून प्रोग्रॅम लिहायला सांगता ते तुम्ही तुमचे लॉजिक वापरून विद्यार्थ्यांना सांगता त्याचा फायदा असा होतो की विद्यार्थी आपल्आपल् लॉजीक लावून प्रोग्रॅम बनवतात आणि हा प्रोग्रॅम बनवत असताना प्रत्येक विद्यार्थ्याकडून काही ना काही चुका होत असतात या झालेल्या चुका ग्रुपमध्ये चर्चा करून सोडवल्या जातात आणि विद्यार्थ्यांना आलेल्या शंकेचे स्पष्टीकरण योग्य रीतीने दिले जाते.शाळेत असताना कॉलेजमध्ये असताना लेक्चर ला बसले खूप बोर होत असायचे पण तुमच्या क्लास मध्ये सात सात तास बसून पण कंटाळा अजिबात येत नसायचा कारण तुम्ही क्लासमध्ये विद्यार्थ्यांसोबत पूर्णपणे एकजीव झालेला असता तुम्ही चालू असलेला विषय सगळ्या विद्यार्थ्यांना पूर्णपणे समजल्याशिवाय तुम्ही पुढल्या विषयाला हात घालत नाही आणि हीएक खरच खूप चांगली अशी गोष्ट आहे जी आजकालच्या शिक्षकांमध्ये बघायला भेटत नाही.
तुमच्या संस्थेमध्ये प्रवेश घ्यायच्या आधी आणि तुमच्या संस्थेत प्रवेश घेऊन शिक्षण झाल्यानंतर माझ्यात अतुलनीय असा बदल झालेला आहे एक वेगळाच असा आत्मविश्वास निर्माण झाला आहे
खरंच तुम्ही खूप महान असे शिक्षक आहात.